अर्जुनस्मृती फाउंडेशन संस्थेच्या पायाभरणी वर्षांपासूनच म्हणजे सन २०११ पासून समाजाच्या विविधांगी उन्नतीसाठी विशेषतः आरोग्य, शिक्षण, संस्कृती, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती अशा बहुविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उत्कटतेने कार्य करत आहे.
अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीस, समुदायास अथवा घटकास शक्यतोपरी मदत करणे आणि सोबतच आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्ती अशा क्षेत्रामध्ये सृजनात्मक बहुउद्देशीय कार्य करत राहणे ही आपल्या संस्थेची प्रमुख ध्येय आहेत.
सुरु असलेल्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता संस्था सदस्यांकडून ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून करत आहे. सोबतच उपक्रमांबद्दलची माहिती जनसामान्यांमध्ये देऊन त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी आवाहन करून ऐच्छिक देणगी स्वरूपात निधी उभारणी करत आहे.
“Every good act is a charity, where there is charity and wisdom, there is neither fear nor ignorance”.
अवघ्या आठ ते नऊ वर्षाच्या वयातही समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्माची आवड अशा सदगुणांनी संपन्न असे आमचे धाकले बंधू स्वर्गवासी अर्जुन लहू कोकाटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्जुनस्मृती फाउंडेशनची पायाभरणी साधारणत: २०११ साली झाली. तेव्हापासून अर्जुनस्मृती फाउंडेशन मार्फत प्रतीवर्षी विविध समजपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. संस्था बहुउदेशीय असल्याने काही एक विशिष्ट हेतू न ठेवता, संस्थेच्या संपर्कात येणाऱ्या गरजवंतांना शक्यतोपारी मदत करण्याच्या हेतूने, "बहुतांचे कामी यावे...!" हे ब्रीद घेऊन आपली संस्था कार्य करत आहे. दिवसेंदिवस संस्थेच्या कार्यास मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढत आहे. लवकरच संस्थेचा नावलौकिक होऊन आपले अर्जुनस्मृती फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती संबंधी उपाय आणि मदतीसाठी एक ठोस विकल्प म्हणून पुढे येईल अशी आशा आहे.
17 June 2023
मागील वर्षीपासून अर्जुनस्मृती फाउंडेशन मार्फत पर्यावरण रक्षणासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण / बिजारोपण चा उपक्रम राबवला जात आहे...
12 June 2023
आपल्या फाउंडेशन मार्फत प्रतीवर्षी किमान दोन दिंडीमध्ये सेवा देण्याचा उपक्रम मागील ९-१० वर्षांपासून सुरु आहे...
28 May 2023
जागतिक World Menstrual Hygiene Day चे निमित्त साधून अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या...
May 2023
उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आहे जी उष्ण आणि दमट परिस्थितीत दीर्घकाळापर्यंत वास्तव्याने...
15 May 2023
आपल्या आयुष्यात ऑक्सिजनला किती महत्त्व आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली की आपला जीव गुदमरू लागतो...
27 February 2023
मराठी साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा केला जातो...
अर्जुनस्मृती social foundation व त्यांचे सदस्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर यशस्वीपणे काम करणारे सातारा हॉस्पिटल सातारा चे गुणवंत डॉ. चंद्रशेखर कोकाटे यांचे कार्य अत्यंत आदरणीय व कौतुकास्पद आहे ...
सन्मानिय पदाधिकारी/Volunteers आपले विविध सामाजिक कार्यक्रम आपण या page मार्फत दर्शित करताना आपण करत असलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्य खरचं कौतुकास्पद अाहे त्याबद्दल तुमचे मनपुर्वक अभिनंदन आणि भविष्यात आपल्या मार्फत अशीच सामाजिक कार्य घडो या साठी आपणास मनपुर्वक शुभेच्छा 💐💐
VOLUNTEERS DO NOT NECESSARILY HAVE 'TIME' THEY HAVE THE 'HEART'😍
Nice initiative... inspiration at itself... feeling proud to be a part of it 😀
nice initiative... really helpful...
Great initiative... really appreciable...
Very Nice initiative started in publicinterest...keep it up...