अर्जुनस्मृती फाउंडेशन गेली 11 वर्षे समाजाच्या उन्नतीसाठी, विशेषत: आरोग्य, शिक्षण, संस्कृती, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने संवर्धन या क्षेत्रात सेवाभावी आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उत्कटतेने काम करत आहे.
“Every good act is a charity, where there is charity and wisdom, there is neither fear nor ignorance”.
अवघ्या आठ ते नऊ वर्षाच्या वयातही समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्माची आवड अशा सदगुणांनी संपन्न असे आमचे धाकले बंधू स्वर्गवासी अर्जुन लहू कोकाटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्जुनस्मृती फाउंडेशनची पायाभरणी साधारणत: २०११ साली झाली. तेव्हापासून अर्जुनस्मृती फाउंडेशन मार्फत प्रतीवर्षी विविध समजपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. संस्था बहुउदेशीय असल्याने काही एक विशिष्ट हेतू न ठेवता, संस्थेच्या संपर्कात येणाऱ्या गरजवंतांना शक्यतोपारी मदत करण्याच्या हेतूने, "बहुतांचे कामी यावे...!" हे ब्रीद घेऊन आपली संस्था कार्य करत आहे. दिवसेंदिवस संस्थेच्या कार्यास मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढत आहे. लवकरच संस्थेचा नावलौकिक होऊन आपले अर्जुनस्मृती फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती संबंधी उपाय आणि मदतीसाठी एक ठोस विकल्प म्हणून पुढे येईल अशी आशा आहे.