प्लाझ्मा दान शिबिर

अतिथी देवो भव: 🙏 ...मध्यप्रदेशातील एक तरुण पुण्यात चाकणमध्ये कामानिमित्त आल्यानंतर त्याला कोविडची बाधा झाली. सध्या व्हेंटिलेटरवर आहे. त्याला plasma therapy द्यायची ठरल्यानंतर Plasma Donor साठी आमच्याकडे चौकशी झाली. बिलकूलही वेळ न दवडता Plasma Donor शोधला. आमच्या plasma donor च्या ग्रुप वर श्री. संजय साबळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना रुग्ण मध्यप्रदेश राज्यातील आहे सांगितल्यावर त्यांनी, "रुग्ण बाहेरच्या राज्यातील आहे म्हटल्यावर, तो आपला पाहूणा झाला आणि अतिथी देवो भव: ही आपली नीती आहे...!" असे म्हणून लगेच Plasma Donation साठी संमती दर्शविली आणि ३ ते ४ तासांमध्ये रुग्णासाठी Plasma उपलब्ध झाला.