आरोग्य शिबिर
मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या आपल्या दरवर्षी किमान तीन आरोग्य शिबिराच्या उपक्रमाला कोरोना संकटामुळे विराम मिळाला होता, परंतु श्री. धंनजय ताणले यांनी यावेळी नवखी कल्पना सुचविली आणि रानोवनी फिरत असलेल्या मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन त्यांची आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक प्रबोधन करण्यामध्ये अर्जुनस्मृती फौंडेशनच्या पूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले. हे सर्व वाडे जेंव्हा स्वतःच्या गावी जातील तेंव्हा कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करून घेणे आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार लहान बाळांचे लसीकरण करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केले...
दोन दिवसीय शिबिरात 200हुन अधिक लोकांनी सहभाग नोंदविला.