सज्जनगड स्वछता मोहीम
३१डिसेंबर चे औचित्य साधून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला होता. साधारण पंधरा मावळयांसोबत सुरू केलेली सज्जनगड स्वछता मोहीम गडावर आलेल्या आमच्या व्यतिरिक्त ईतर लोकांनीही सहभाग घेऊन खूपच चांगल्या पद्धतीने संपन्न केली.
साधारण १३ मोठ्या बॅग भरून प्लास्टिक जमा केले. गडावर जाताना प्लास्टिक जमा करत गेलो, परत येताना दिसणारा प्लास्टिक मुक्त परिसर पाहून अवर्णनीय आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. त्यात सोबत गडावर छोटेखाणी स्टॉल मांडून बसलेल्या आणि फिरायला आलेल्या लोकांनकडून मिळणारी कौतुकाची थाप खुपच प्रसन्न करणारी ठरली
पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे मद्यपान करून, नाचगाण्याने आनंदतोत्सव साजरा न करता सरत्या वर्षाला अशाप्रकारे निरोप देण्याच्या कल्पनेला जो प्रतिसाद सर्वांनी दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार🙏🙏
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐