दिंडी

दोन वर्षांपासून दिंडीला लागलेले कोरोनाचे ग्रहण अखेर सुटले आहे, संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या दोन्ही दिंड्या पुन्हा त्याच दिमाखात भक्तिमय वातावरणात पंढरीकडे कूच करत आहेत... वारीमधील आनंदाची अनुभूती वारी याची देही - याची डोळा पाहिली तरच येतो हेही तितकेच खरे.

याच निमित्ताने आज सालाबादाप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी मध्ये एकदिवसीय आरोग्य शिबीर आयोजित केले होते. हजारो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात वर्णिन्या पलीकडचा आहे. फौंडेशनच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांना आरोग्य सेवा देऊ शकलो याचे समाधान सुद्धा अवर्णनीय आहे.