blog post

Cataract Camp

Environmetal forum of India, Baramati या NGO मार्फत आयोजित मोतीबिंदू बिनाटाका शस्त्रक्रिया शिबिरात आज शासकीय आयुर्वेद मेडिकल कॉलेज, बारामती मार्फत मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. दरम्यान प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. लहाने सरांची भेट झाली. नेते-अभिनेते लोकांच्या भोवती जमणाऱ्या गर्दीपेक्षा मराठवाड्याच्या सामान्य कुटुंबातून स्वकर्तुत्वाने मोठ्या झालेल्या अशा असामान्य माणसाभोवतीची गर्दी पाहून छाती आपसूक अभिमानाने फुगते!

Environmetal forum of India, Baramati चे शिस्तबद्ध कार्य खरंच प्रेरणादायी आहे. NGO चालवताना लागणारी शिस्त, चिकाटी आणि एकोपा त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. आपल्या अर्जुनस्मृती फौंडेशन महाराष्ट्र राज्य च्या कार्यशैलीत सुधार करण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील...