लक्ष्य : ५००० वृक्षारोपणाचे

मागील वर्षीपासून अर्जुनस्मृती फाउंडेशन मार्फत पर्यावरण रक्षणासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण / बिजारोपण चा उपक्रम राबवला जात आहे. मागील वर्षी साधारण ८८५ करंज बीज लागवड केली होती परंतु या उपक्रमास अपेक्षित यश आले नव्हते त्यामुळे या वर्षी किमान ५०००बीज रोपण करण्याचा हेतू घेऊन उन्हाळ्यात शक्य तितक्या बीया संकलित केल्या होत्या. त्याची संख्या ८०००पेक्षाही जास्त झाली आहे. यामध्ये बाभूळ, सुबाभूळ, येडीबाभूळ, करंज, चिंच, इंग्रजी चिंच, आंबा,कडू लिंब, गुलमोहर अशा वन्य वृक्षाच्या बियांचा समावेश आहे. त्यापैकी साधारण १५०० बिया सीड्बॉल पद्धतीने लागवड करून इतर बिया टोकन आणि ओसाड जागेत अथवा रस्त्याच्या दुतर्फा विखरुण लागवड केली आहे.