मासिक पाळी जागरूकता अभियान (World Menstrual hygiene day )
जागतिक World Menstrual Hygiene Day चे निमित्त साधून अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर विविध शाळा, कार्यालये, विविध बहुउद्देशीय महिला मंडळे आदी ठिकाणी लोकांना मासिक पाळी, त्याबद्दलच्या रूढी, गैरसमजुती आणि त्यामुळे उद्भवणारे आजार इत्यादीबद्दल मार्गदर्शन करून जागरूकता निर्माण करणे असा उपक्रम फाउंडेशन च्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. शैलजा कोकाटे यांच्या पुढाकाराने हाती घेतला आहे.