उष्माघात : जागरूकता आणि उपाय
उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आहे जी उष्ण आणि दमट परिस्थितीत दीर्घकाळापर्यंत वास्तव्याने किंवा शारीरिक श्रमामुळे शरीराचे मुख्य तापमान सामान्य पातळीपेक्षा (सामान्यतः 104°F किंवा 40°C पेक्षा जास्त) वाढते तेव्हा उद्भवते. उष्माघात हा उष्मा-संबंधित आजाराचा एक गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. उष्माघाताचा वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. परिश्रमात्मक उष्माघात हा प्रकार आपल्याकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. उष्माघातावर वेळीच उपाय केले नाहीत तर मृत्युसारखे गंभीर उपद्रव उद्भवू शकतात त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये याबद्दल मार्गदर्शन, प्रतिकार आणि उपाय यासंदर्भात जागरूकता उपक्रम राबविला.