प्रथमोपचार आणि basic life support ( BLS ) training program
आपल्या आयुष्यात ऑक्सिजनला किती महत्त्व आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली की आपला जीव गुदमरू लागतो. अशीच स्थिती जर दीर्घकाळ राहिली तर जीवही जाऊ शकतो. नाका-तोंडात पाणी गेल्यानं, एकदम दाट धुरामध्ये अडकल्यास किंवा हार्ट अटॅक आल्यास ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे, एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं किंवा डॉक्टरनं आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्णाला तोंडानं श्वास दिल्याचंही तुम्ही पाहिलं आणि ऐकलं असेल. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? याबद्दल जनसामान्यांमध्ये अनेक संभ्रम आणि भीती आहे. त्याबद्दल जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत सीपीआर (CPR) असं म्हणतात. कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन (Cardiopulmonary Resuscitation) असा सीपीआरचा लाँगफॉर्म आहे. आपत्कालीन वैद्यकीय (medical emergency) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) आलेल्या आणि श्वास कोंडलेल्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. काही वेळा कार्डिऍक अरेस्टमुळं (Cardiac arrest) व्यक्तीचा श्वास कोंडला जातो. तिला सामान्यपणे श्वास घेता येत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजनची (Artificial oxygen) अत्यंत आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळी सीपीआर फार उपयुक्त ठरतो. अशा या सोप्या आणि अतिशय उपयुक्त उपक्रमाबद्दल जनसामान्यांना जागृत करणे, त्याबद्दल पुरेसे training देणे आणि अशा लोकांना लोकोपयोगी कार्यात कामी येण्यासाठी आवाहन करणे अशा प्रकारे कार्य आपले फौंडेशन वर्षभर करते आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान डॉ. वाहिदा मुजावर मॅडम ट्रैनिंग देताना...