रस्ते अपघातातील युवकास आर्थिक मदत : नोव्हेंबर २०१७

साधारण पंचवीशीच्या वयातील फाउंडेशनच्या सदस्यांच्या ओळखीतील युवक रस्ते अपघातात जखमी होऊन पाय खूप खराब पद्धतीने फ्रॅक्चर झाला. वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीने एका पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करून हाड जुळविणे गरजेचे होते. त्यासाठीचा खर्च सदर मित्रास न झेपणारा होता. अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून एका हाकेला प्रतिसाद देत बऱ्याच हितचिंतकांनी मदत करून त्याच्या हॉस्पिटल बिलाचा खर्च अर्ध्यापर्यंत उचलला. सोबतच औषधिंच्या खर्चासही चांगला हातभार लावला. तो दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम झाला. फाउंडेशनच्या आवाहणामुळे त्यास साधारण १.२५ लाखाची मदत मिळाली. याबद्दल आभार प्रदर्शीत करतानाचा त्याचा आनंदी चेहरा अशा समाजपयोगी कामास ऊर्जा देणारा आहे.