संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी आरोग्य शिबीर २०२३ : वर्ष ९ वे
कोविड काळातील २ वर्ष सोडले तरी आपल्या फाउंडेशन मार्फत प्रतीवर्षी किमान दोन दिंडीमध्ये सेवा देण्याचा उपक्रम मागील ९ वर्षांपासून सुरु आहे. त्यात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी वारीची पालखी म्हणजे या उपक्रमासाठी पर्वणी असते. सालाबादप्रमाणे यावर्षीही पुण्यश्लोक फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने आपले आषाढी वारीतील आरोग्य शिबीर लक्षणीय ठरले. यामध्ये डॉ. गडदे, डॉ.पोंदे, डॉ. गाडेकर, डॉ. पुजारी डॉ. कोकाटे, डॉ. रनवरे, डॉ. काशीद आदी डॉक्टरांनी तपासणी करून औषध वाटप केले. फाउंडेशनचे सक्रिय सदस्य श्री. खेलबा कोकाटे यांनी जखमी वारकऱ्यांना मलमपट्टी (ड्रेसिंग) करून वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकवेळी डॉक्टरच असणे गरजेचे नाही हे दाखवून दिले. यामध्ये साधारण २३००पेक्षा जास्त वारकऱ्यांची सेवा घडली. यनिमित्ताने पुण्यश्लोक फाउंडेशनचे मा. धनंजय तानले यांनी अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि मागील तीन वर्षांपासून संयुक्त कार्यक्रम राबवून सक्रिय सहभाग दाखवल्याबद्दल आभार मानले. शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.