बहुतांचे कामी यावे |
बहुतांचे सुखी सुखावे ||

चला एकत्र येवूया
Join Us Now
prmo icon

आमच्याबद्दल...

अर्जुनस्मृती फाउंडेशन संस्थेच्या पायाभरणी वर्षांपासूनच म्हणजे सन २०११ पासून समाजाच्या विविधांगी उन्नतीसाठी विशेषतः आरोग्य, शिक्षण, संस्कृती, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती अशा बहुविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उत्कटतेने कार्य करत आहे.

prmo icon

आमचे ध्येय :

अर्जुनस्मृती फाउंडेशनच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीस, समुदायास अथवा घटकास शक्यतोपरी मदत करणे आणि सोबतच आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, शिक्षण आणि नैसर्गिक आपत्ती अशा क्षेत्रामध्ये सृजनात्मक बहुउद्देशीय कार्य करत राहणे ही आपल्या संस्थेची प्रमुख ध्येय आहेत.

prmo icon

निधी उभारणी :

सुरु असलेल्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता संस्था सदस्यांकडून ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून करत आहे. सोबतच उपक्रमांबद्दलची माहिती जनसामान्यांमध्ये देऊन त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी आवाहन करून ऐच्छिक देणगी स्वरूपात निधी उभारणी करत आहे.

profile

Dr. Chandrashekhar Kokate CEO & Founder of Arjunsmruti Social Foundation.

“Every good act is a charity, where there is charity and wisdom, there is neither fear nor ignorance”.

संस्थापकांचे मनोगत :

अवघ्या आठ ते नऊ वर्षाच्या वयातही समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्माची आवड अशा सदगुणांनी संपन्न असे आमचे धाकले बंधू स्वर्गवासी अर्जुन लहू कोकाटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्जुनस्मृती फाउंडेशनची पायाभरणी साधारणत: २०११ साली झाली. तेव्हापासून अर्जुनस्मृती फाउंडेशन मार्फत प्रतीवर्षी विविध समजपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. संस्था बहुउदेशीय असल्याने काही एक विशिष्ट हेतू न ठेवता, संस्थेच्या संपर्कात येणाऱ्या गरजवंतांना शक्यतोपारी मदत करण्याच्या हेतूने, "बहुतांचे कामी यावे...!" हे ब्रीद घेऊन आपली संस्था कार्य करत आहे. दिवसेंदिवस संस्थेच्या कार्यास मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढत आहे. लवकरच संस्थेचा नावलौकिक होऊन आपले अर्जुनस्मृती फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती संबंधी उपाय आणि मदतीसाठी एक ठोस विकल्प म्हणून पुढे येईल अशी आशा आहे.

मुख्य कार्यकारिणी

team

डॉ.चंद्रशेखर गोविंदराव कोकाटे संस्थापक, सचिव

team

डॉ.सौ.शैलजा चं. कोकाटे (पोरे) कार्यकारी अध्यक्ष

team

सौ. सोनाली महेश लिके उपाध्यक्ष

team

डॉ. सागर मारुती शेंडगे सहसचिव

team

श्री. अमरदीप तूकाराम केसरे खजिनदार

team

श्री. प्रतीक दीपक अहिरे Technical Head, Software & Web Design

team

श्री. अविनाश ढगेTechnical Head, Digital & Social Media Marketing

team

श्री. खेलबा लहू कोकाटेसदस्य

चला एकत्र येवूया...

Recent Events

प्रशंसापत्र

ArjunSmruti Social Foundation

Every good act is a charity, where there is charity and wisdom, there is neither fear nor ignorance

Arjunsmruti Foundation Location

  • info@arjunsmrutifoundation.com
  • +(91) 8090079006
  • www.arjunsmrutifoundation.com
  • A/P Gour Tal. Kallam Dist. Osmanabad - 413525